• Total Visitor ( 429452 )
News photo

जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन    

Raju tapal August 18, 2025 99

जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन    



चित्रपट,मालिका,नाटकांमधून तसेच गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट सृष्टीत काम करणा-या जेष्ठ, लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२ व्या वर्षी अभियानाला सुरुवात केली. गुरू,ढोलकी,तिचा उंबरठा,पाऊलवाट,सलाम,सांजपर्व अशा अनेक चित्रपटांत काम ज्योती चांदेकर यांनी केले. छोट्या पडद्यावरील तु सौभाग्यवती हो, छत्रीवाली‌ या मालिकांमध्येही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांची कन्या तेजस्विनी पंडित हिच्यासोबत त्यांनी 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात भूमिका केली.ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठ वैकूंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.



प्रतिनिधी :- विजय ढमढेरे 





            


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement