जेष्ठ समाजसेवक,पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांचा वाढदिवस आळंदीत साजरा
माऊली मंदिरात पूजा अभिषेक,सिद्धबेटात वृक्षारोपण
पुणे:- ज्येष्ठ समाज अण्णा साहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिरात श्रींचे वैभवी चल पादुकांवर अभिषेक पूजा करण्यात आली. पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी आळंदीत साजरा करण्यात आला. सिद्धबेट येथे वृक्षारोपण,स्वकुळ साळी समाज ज्ञातीगृह सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे विशेष उल्लेखनीय कार्याचा सन्मानपत्र,श्रीफळ,शाल, उपरणे देऊन सत्कार करीत सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संयोजक अर्जुन मेदनकर,बाळासाहेब चौधरी,सुरेशभाऊ टाकळकर,प्रकाश पाचारणे,रोहिदास कदम,सचिन तापकीर,अमित गडदे,गौतम पाटोळे, शिवाजी कारेकर गुरुजी,बाजीराव नाना लोखंडे,बाबासाहेब भंडारे,हमीद शेख,श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी यांनी वेदमंत्र जय घोष करीत श्रींची पूजा केली. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना दीर्घायुरोग्य लाभावे या साठी पूजा,प्रार्थना करीत साकडे घालण्यात आले. पुरस्कार वितरण प्रसंगी खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक दत्तात्रय सातपुते, जाणीव जागृती मंच खेड अध्यक्ष विठ्ठल भोर,सुनील मांजरे, सतीश चांभारे,आरुडे गुरुजी,गोविंद बुट्टे,ॲड.निलेश आंधळे,खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष बाळासाहेब गवते,हिरामण पडवळ,सुवर्णाताई काळे,डॉ. ज्योत्स्ना आवारी,मनोहर दिवाणे,गोरक्षनाथ महाराज वर्पे, कुंडलिक चौधरी,माऊली चौधरी,सचिन तापकीर,मंडलाधिकारी प्रशांत शेटे,रहिदास कदम आदींना सन्मानित करण्यात आले. संयोजन अर्जुन मेदनकर,बाळासाहेब चौधरी,गौतम पाटोळे,प्रकाश पाचारणे आदी केले. सिद्धबेटात वृक्षारोपण आणि स्वकुळ साळी समाज ज्ञातीगृह येथील कार्यक्रमात १८ मान्यवर पदाधिकारी यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र,शाल,उपरणे,श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.