• Total Visitor ( 481723 )
News photo

एच पी पंपावरून रोकड लंपास करणा-या कामगारांना गुजरात मधून अटक

Raju tapal August 20, 2025 70

एच पी पंपावरून रोकड लंपास करणा-या कामगारांना गुजरात मधून अटक; शिरूर पोलीसांची कामगिरी 



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील निमोणे - गुनाट रस्त्यावर असलेल्या एच पी पंपावरून ९४ हजार ५२७ रूपयांची रोकड लंपास करणा-या कामगारांना शिरूर पोलीसांनी जेरबंद केले.

रामेश्वर हरिश्चंद्र गोंड रा.देवरी, मध्यप्रदेश,रमण सिताराम ठाकूर रा.बदनपूर नरसिंगपूर मध्यप्रदेश,सोनू ठाकूर हाथीडोल, मध्यप्रदेश, आणि एका विधीसंघर्षित बालकाने २१ जुलैला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास निमोणे - गुनाट रोडवरील एच पी पंपावरून ९४ हजारा़ची रोकड चोरून नेल्या बाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस हवालदार प्रताप टेंगले तपास करत असताना आरोपी रामेश्वर गोंड गुजरात मधील मोरबी‌ तालुक्यातील साखोडा येथे असल्याची माहिती प़ोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप,अजय पाटील यांच्या पथकाने गुजरातला जावून तेथील पोलीसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. विधीसंघर्षित बालकास येरवडा,पुणे येथील बाल न्याय मंडळासमोर हजर केले.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement