लेखिका सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम
लेखिका सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमाअंतर्गत काव्य अभिवाचन स्पर्धेत शालेय गटात तीर्था मयेकर, महाविद्यालयीन गटात सेजल मेस्त्री,खुल्या गटात हर्षाली केळकर,यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर गद्य अभिवाचन स्पर्धेच्या शालेय गटात रमा कानविंदे,महाविद्यालयीन गटात आर्या वंडकर आणि खुल्या गटात पूर्वा खालगावकर यांनी बाजी मारली. राज्य मराठी विकास संस्था,मराठी भाषा विभाग आणि आर्ट सर्कल आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचे उद्घाटन काव्य अभिवाचन स्पर्धेने झाले. प्रसिद्ध अभिनेत्री आणि समांतर रंगभूमीच्या चळवळीतील ज्येष्ठ कलाकार शुभांगी दामले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या दोन्ही स्पर्धा सुनीताबाईंची शाळा असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये पार पडल्या. या उद्घाटनप्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, परीक्षक आणि डॉ. मेधा गोंधळेकर उपस्थित होत्या. शालेय, महाविद्यालयीन आणि खुला अशा तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित, बालनाट्य चळवळीतील डॉ. राजेंद्र चव्हाण,अभिनेता स्वानंद देसाई आणि अभिनेत्री मयूरा जोशी यांनी केले. स्पर्धा दोन दिवस झाली. यात पहिल्या दिवशी शुभांगी दामले यांनी आहे मनोहर तरी मधील काही भागांचे अभिवाचन केले. दुसऱ्या दिवशी परीक्षक वामन पंडित यांनी अभिवाचन करून स्पर्धेची सांगता केली. याच दिवशी स्वा. सावरकर नाट्यगृहात पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम आणि मुकेश माचकर लिखित मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास असे दोन दीर्घांक सादर झाले. उपक्रमात दुसऱ्या दिवशी जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई यांचा पत्राद्वारे झालेल्या संवादाचे अभिवाचन लेखिका, गायिका, अभिनेत्री माधुरी पुरंदरे आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी केले. काव्य अभिवाचन स्पर्धा: शालेय गट: प्रथम- तीर्था दीपक मयेकर,द्वितीय - तीर्था संदीप नाखरेकर,आणि तृतीय -आरोही श्रीकांत पवार. महाविद्यालयीन गट: प्रथम- सेजल भार्गव मेस्त्री,द्वितीय- श्रीया अभिजीत केळकर,तृतीय- आर्या समीर वंडकर. खुला गट: प्रथम- हर्षाली केळकर, द्वितीय- मानसी मंगेश चव्हाण,तृतीय- योगिनी राजाराम भागवत आणि उत्तेजनार्थ पूर्वा मकरंद साने. गद्य अभिवाचन स्पर्धा : शालेय गट: प्रथम- रमा कानविंदे,द्वितीय- प्रत्युष पूर्वा प्रसन्न पेठे आणि तृतीय- स्वराली उमेश टापरे. महाविद्यालयीन गट: प्रथम- आर्या समीर वंडकर,द्वितीय- सिद्धी उदय रानडे,तृतीय- मेघा अविनाश पेंडसे. खुला गट: प्रथम- पूर्वा खालगावकर,द्वितीय- दीप्ती आनंद पंडित,तृतीय- आभा राजेंद्र घाणेकर.