• Total Visitor ( 430264 )
News photo

उत्तमसरा येथे योग दिन उत्साहात साजरा 

Raju tapal June 23, 2025 52

उत्तमसरा येथे योग दिन उत्साहात साजरा 



शिक्षक,शाळकरी मुलांसह विद्यार्थ्यांचा सहभाग



अमरावती/भातकुली :- पंचायत समिती भातकुली मधिल उत्तमसरा येथे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच पी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालय,अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



या कार्यक्रमात चंद्रकांत करपते,वरुण मावळे,साहिल शेगोकार,प्रथमेश मालधुरे,जयदत्त मुंडे आणि विश्वजीत जाधव या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले व तसेच डॉ.मुकुंदा सवई (Art of living ) यांनी ध्यान साधने बद्दल मार्गदर्शन व विद्यार्थांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले व योगाभ्यासाचे महत्व सांगितले .



शाळेतील शिक्षक राजेश सावरकर,गजानन येलोणे,प्रमोद कांबळे व विद्यार्थ्यांनीही त्यात सक्रिय सहभाग घेत आपल्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व समजून घेतले. योगामुळे शरीरासोबत मनही ताजेतवाने राहते,असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व कृषी महाविद्यालयाच्या अंतीमवर्षाच्या सातव्या सत्राच्या (R.A.W.E- Rural Agricultural Work Experience) च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील मुलांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश सफल झाला.

=======================

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement