• Total Visitor ( 487874 )
News photo

योगेश मुंढराचा सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा उद्ध्वस्त...

Raju Tapal publisher April 19, 2026 43

योगेश मुंढराचा सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा उद्ध्वस्त; 



अश्लील व्हिडिओच्या जोरावर तरुणीचा छळ करणारा नराधम फरार!



प्रतिनिधी



ठाणे: स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा आणि 'एक ठाणेकर' या नावाने वावरणाऱ्या योगेश मुंढरा (३५) या विकृत नराधमाचा 'सेक्स आणि ब्लॅकमेलिंग'चा घाणेरडा धंदा उघडकीस आला असून, या नराधमाने एका २२ वर्षीय तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून जुलै २०२४ पासून या नराधमाने पीडितेवर महापे आणि मुंब्रा बायपासच्या निर्जन स्थळी नेऊन वारंवार पाशवी अत्याचार केले. केवळ वासना भागवून हा नराधम थांबला नाही, तर त्याने पीडितेचे अश्लील व्हिडिओ शूट करून तिला स्वतःच्या तालावर नाचवणारे 'सावज' बनवले.

"माझे ऐकले नाहीस तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी देऊन या 'प्रोफेशनल' ब्लॅकमेलरने तरुणीला दहशतीखाली ठेवले आणि तिचा वापर चक्क गुन्हेगारी कृत्यांसाठी केला. त्याने पीडितेवर दबाव टाकून विविध कार्यालयांमधून महत्त्वाच्या फाईल्स आणि तक्रार अर्ज चोरून आणण्यास भाग पाडले. जेव्हा या तरुणीने त्याच्या अमानुष छळाला आणि मागण्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या विकृताने आपली क्रूरता दाखवत तिला लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि डोक्यात काठीने भीषण प्रहार करून तिला रक्तबंबाळ केले.

या घटनेमुळे ठाण्यात संतापाची लाट उसळली असून मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस २०२३ च्या कलम ६९, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरून फिरणारा हा नराधम सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास आता थेट ठाणे क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला असून, या ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात आणखी किती तरुणी भरडल्या गेल्या आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. स्वतःला 'एक ठाणेकर' म्हणवून घेणाऱ्या या विकृताला लवकरात लवकर बेड्या ठोकून त्याला फासावर लटकवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंढराचा हा काळा धंदा केवळ एका तरुणीपुरता मर्यादित नव्हता. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अनेक बड्या बिल्डर्स आणि उद्योजकांना (Businessmen) आपल्या जाळ्यात ओढून त्यांचेही ब्लॅकमेलिंग केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या टोळीला काही राजकीय व्यक्तींचेही पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे सुशांत सुर्वे याच्याशी जोडले जाण्याची शक्यता आहे, ज्याला यापूर्वी एका प्रसिद्ध स्वीटमार्ट मालकाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आणि ठाणे महानगरपालिकेचे (TMC) उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावरील खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. यामुळे हे प्रकरण आता केवळ अत्याचाराचे न राहता एका मोठ्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटकडे वळत असल्याचे दिसत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement