• Total Visitor ( 714588 )
News photo

मराळेश्वर विद्यालयात HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात....

Raju Tapal publisher October 05, 2026 31

मराळेश्वर विद्यालयात HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात....



कल्याण : प्राथमिक आरोग्य केंद्र, दहागाव आणि प्रीती अकॅडमी लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने म्हारळ येथील मराळेश्वर विद्यालयात HPV लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थिनी,पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी HPV विषाणू, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, HPV लसीचे महत्त्व, लसीकरणाचे योग्य वय,विविध वयोगटांनुसार डोस, लसीचे फायदे तसेच लसीकरणाबाबत असलेले गैरसमज याबाबत डॉक्टरांच्या पथकाने सविस्तर मार्गदर्शन केले.

पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉक्टरांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. HPV लसीकरणामुळे वंध्यत्व येते हा गैरसमज चुकीचा असून ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जनजागृतीसाठी प्रीती अकॅडमी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राजेंद्र पवार आणि टीम यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी पथनाट्य सादर केले. पथनाट्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.

कार्यक्रमास डॉ. रेणू तिलोकचंदानी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव, दीपक शिर्के,तसेच दहागावच्या १५ आशा सेविका उपस्थित होत्या. शैक्षणिक क्षेत्रातून मराळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास घोलप,प्रीती अकॅडमी लॉ कॉलेजचे प्राचार्य राठोड आणि ॲड.प्रकाश दीपक साळवे,लीगल एड सेल यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीती अकॅडमीचे संचालक प्रितम शर्मा,मराळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “सुजाण मुली, सशक्त भारत” आणि “Healthy Girls, Healthy India” हा संकल्प केला.

आयोजक : प्राथमिक आरोग्य केंद्र, दहागाव व प्रीती अकॅडमी लॉ कॉलेज


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement