तलावपाळी येथे पुनर्विकास सुरू असलेली जुनी इमारत कोसळली...
ठाणे | प्रतिनिधी
ठाणे पश्चिमेकडील तलावपाळी परिसरात बोटिंग सेंटरसमोर पुनर्विकासाचे काम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळल्याची घटना आज घडली. इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
या दुर्घटनेत जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनास्थळी बचावकार्य आणि पाहणी सुरू असून, अधिकृत माहिती मिळताच पुढील अपडेट देण्यात येईल.