• Total Visitor ( 714596 )
News photo

मांडा-टिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण...

Raju Tapal publisher October 05, 2026 33

मांडा-टिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण...

प्रिया गरूडे यांच्या पुढाकाराला पशुवैद्यकीय डॉक्टरांचे सहकार्य; मुक्या प्राण्यांसाठी स्तुत्य उपक्रम



रेषा जवळ

टिटवाळा : भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना रेबीजसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने श्री क्षेत्र मांडा-टिटवाळा पूर्व येथील एकदंताय बिल्डिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे भटक्या कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण करण्यात आले.

हा उपक्रम प्रिया मोहन गरूडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. त्या भटक्या कुत्र्यांची नियमित फिडिंग तसेच प्राण्यांच्या सेवेसाठी कार्यरत असून, मनेका गांधी यांच्या संस्थेशीही संबंधित आहेत.

दि. ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत डोंबिवली येथील पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. निलेश भणगे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यासोबत राज बिंद्रा व डॉ. पाटील यांनीही लसीकरणासाठी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याने भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम निःशुल्क स्वरूपात राबविण्यात आला. भटक्या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही रेबीज लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मूक प्राण्यांप्रती संवेदनशीलता जपत त्यांच्या आरोग्यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम समाजोपयोगी आणि लोककल्याणकारी असल्याचे गरूडे कुटुंबीयांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे प्राणीप्रेमी नागरिकांमध्येही जनजागृती होऊन भटक्या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गरूडे गुरूजी व माई गरूडे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणारे डॉ. निलेश भणगे,राज बिंद्रा व डॉ. पाटील यांचे आभार मानले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement