ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन....
मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची आणि कलेची वेगळी छाप उमटवली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.