१५ लाखांची रोकड घेवून फरार झालेल्या कारचालकास अटक
Raju tapal
October 17, 2021
37
१५ लाखांची रोकड घेवून फरार झालेल्या कारचालकास अटक ; सरकारवाडा पोलीसांची कामगिरी
------------------
मालक सलूनमध्ये गेल्याची संधी साधत १५ लाखांची रोकड घेवून फरार झालेल्या कारचालकास सरकारवाडा गुन्हे शोध पोलीसांनी सापळा रचून सोलापूरमध्ये अटक केली.
विकास उर्फ विक्की उत्तम मोकासे वय -३१ रा.महाकाली चौक पवननगर सिडको ,नाशिक असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव असून त्याच्या ताब्यातून १३ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
कारचालक मोकासे हा अली गुलामहुसेन सुराणी रा.शिंगाडा तलाव नाशिक यांच्याकडे चालक म्हणून नोकरीस होता.
सुराणी हे कॅनडा कॉर्नर येथील वेल्डन सलूनमध्ये कारने आले होते. कारचालकाने त्यावेळी १५ लाख रूपयांची रोकड लंपास केली. चोरी केल्यानंतर कारचालक कार लॉक करून पळून गेला.
पोलीसांनी सापळा रचून सोलापूरमध्ये आरोपीला अटक केली. पथकाने त्याच्याकडून १२ लाख २५ हजार रूपयांची रोकड, चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला एक ५४ हजार रूपयांचा आयफोन मोबाईल, एक लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन असा एकूण १३ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काकविपुरे पुढील तपास करीत आहेत.
Share This