गोमांसाची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक
65 किलो गोमांसासह दोन चारचाकी जप्त
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायते नदीच्या पुलाजवळ टिटवाळा पोलिसांनी गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी सह 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 65 किलो गोमांस जप्त करण्यास पोलिसांना यश आलेले आहे.
सदर घटनेत पोलिसांनी जुनेद जलालुद्दीन आणि सकेलन जलालुद्दीन या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132,325, 3(5), 9(1), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम,प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, पशुसंवर्धन अधिनियम यासारख्या विविध कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या त्या दोन चारचाकींवर शिवसेनेच्या वाघाचे चिन्ह तसेच गाडीमध्ये भगव्या शाली आढळून आल्या.