मांडा पश्चिमेतील ५५ वर्षीय इसम बेपत्ता
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडा पश्चिमेतील शब्बीर शेट चाळ मधील रूम नंबर १, जुना पोस्ट ऑफिस जवळ येथे राहणारे असलम बाबू मण्यार वय ५५ वर्ष हे १९ जानेवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेले आहे. तब्बल ५ दिवसांपासून त्याच्या अजूनही काही पत्ता लागला नाही. बेपत्ता व्यक्ती हि रंगाने गोरी असून उंची ४ फूट ५ इंच एवढी आहे. त्यांनी चॉकलेटी रंगाची पॅन्ट व फुल हाताचा शर्ट घातलेला आहे. सदरील व्यक्ती हि अंगाने सडपातळ असून डोक्यावरील केस काळे आहेत. सदरील व्यक्ती बाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हरवल्या बाबत तक्रार दाखल करण्यात आली असून जर कुणाला सदरील व्यक्ती आढळून आल्यास कल्याण तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस नाईक सुदाम सदगीर यांच्या ९८६७६११९११ या नंबर वर संप्रर्क साधावा.