6 वर्षांपासून फरार असलेला मोक्कातील आरोपी जेरबंद
कल्याणच्या गुन्हे शाखा घटक 3 ची कामगिरी
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मधील पाहिजे आरोपी सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-31 वर्षे राहणार अटाळी रोड,आंबिवली हा बर्याच दिवसांपासून फरार होता. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.
पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून तो खडवली परिसरात येणार असल्याचे समजल्याने सापळा रचून पाहिजे आरोपी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 10,000/- रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे.
सदर आरोपीवर एमएफसी, आर के मार्ग,मानपाडा,ताडदेव इत्यादी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर,पोलिस हवालदार कामत,मंगेश शिर्के,सचिन साळवी,सुरेश निकुळे,राहुल ईशी यांनी केली.