आळेफाटा येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा
आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम पळवून नेल्याची घटना सोमवार दि.६/१२/२०२१ रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
आळेफाटा येथील बोरी बुद्रूक येथे अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान असून सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करून त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व दुकानातील रोख रक्कम चोरून नेली.
जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, आळेफाटा पोलीस निरीक्षक मधूकर पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.