आळेफाटा येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद
Raju Tapal
December 11, 2021
55
आळेफाटा येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर पिस्तूलाचा धाक दाखवून दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी सहा आरोपींंना ग्रामीण पोलीसांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून जेरबंद केले.
चोरीची ही घटना सोमवारी दि.६ डिसेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
ऋषिकेश बळवंत पंडीत वय - २२ रा.खरंडी.ता.नेवासा, अरबाज नवाब शेख वय - २० रा.वडाळा व्हेरोबा ता.नेवासा, वैभव रविंद्र गोरे वय - २१, रा.खरवंडी ता.नेवासा, राहूल राम चव्हाण वय - २० रा.खरवंडी ता.नेवासा, शुभम बाळासाहेब शिंदे वय -२१ रा.खरवंडी ता.नेवासा, प्रकाश विजय वाघमारे वय - २० रा.माळीचिंचोरा ता.नेवासा अशी आरोपींची नावे असून प्राथमिक तपासात आरोपी बँन्ड, डी जे व्यवसायाशी संलग्न असल्याचे तपासात समोर आले आहे.
६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बोरी बुद्रूक अविनाश पटाडे यांचे आळेफाटा येथील नगर - कल्याण रोडवरील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकानात प्रवेश करून दुकानातील रोख १८ हजार रूपये मोबाईल व दुचाकीची चावी घेवून चोरटे पसार झाले होते.
त्यानंतर ग्रामीण पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशीचे आदेश दिले होते. चोरीच्या या घटनेसंदर्भात टिटवाळा न्यूजने ७/१२/२०२१ रोजी बातमी प्रसारित केली होती.
या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून अटक केली.
Share This