अवैधरित्या बायोडिझेल औरंगाबादला घेवून जाणा-या दोघांना चाकण पोलीसांकडून अटक
मुंबई येथून औरंगाबादला अवैधरित्या बायोडिझेल घेवून जाणारे दोन कंटेनर शेलपिंपळगाव ता.खेड हद्दीत चाकण पोलीसांनी पकडले.
या बायोडिझेलची किंमत २२ लाख रूपये असून कंटेनरचालक राजू ज्ञानदेव गीते वय - २८ रा. म्हसोबाची वाडी ता.आष्टी जि.बीड , विठ्ठल भानूदास सोनवणे वय ३३ रा.दादेगाव ता.आष्टी जि.बीड अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनूसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, विक्रम गायकवाड, ऋषिकुमार झनकर, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, प्रदीप राळे यांनी चाकण शिक्रापूर मार्गावर सापळा रचून शेलपिंपळगाव येथे दोन कंटेनर ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कागदपत्रे मिळाली नाहीत. शासनाने प्रतिबंधित केलेले बायोडिझेल त्या कंटेनरमध्ये ह़ोते.
मुंबई येथून औरंगाबाद येथे नेण्यात येत होते.
त्यानंतर खेड तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गणेश रोकडे यांनी मालाची पाहणी करून पंचनामा केला.