अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा !
आदिवासी क्रांती सेनेचे तहसीलदार यांना निवेदन !!
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आदिवासी क्रांती सेना मुरबाड यांच्या वतीने आज मुरबाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
परतीच्या पावसाने भात पिकांचे झालेले नुकसान सर्वेक्षण करुन पंचनामे त्वरीत करावे.तसेच हेक्टरी पंचवीस हजार विनाविलंब करता शेतकऱ्यांना द्यावे,व वनपट्टे धारक,व प्रलंबित व्यक्तीचा यात समावेश करावा. आशा विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार संदिप अवारी यांना देण्यात आले.यावेळी क्रांती सेनेचे दिनेश जाधव,दत्तु वाघ, शिवसेनेचे युवा नेतृत्व महेश भांगे व इतर कार्यकर्ते हाजर होते.