• Total Visitor ( 84819 )

अभ्युदय बँकेच्या एटीएममधून 2 लाख 58 हजार रुपयांची चोरी

Raju Tapal September 25, 2022 30

भांडुपच्या अभ्युदय बँकेच्या  एटीएममधून 2 लाख 58 हजार रुपयांची चोरी

एटीएम फोडणाऱ्या दोन हरियाणातील आरोपींना अटक

भांडुप पश्चिमेच्या जंगल मंगल रोड येथील अभ्युदय बँकेच्या एटीएम मशीन मध्ये 16 एटिएम डेबिट कार्डचा वापर करून
अनधिकृतरीत्या खोटे,बनावट ATM कार्ड वापरून 2 लाख 58 हजार रुपयांची अफरातफर करणाऱ्या दोन अस्सल सराईत हरीयाणातील चोरट्यांना  पोलिसांनी अटक केल्याचे  वृत्त हाती आले आहे. या घटनेनंतर भांडुप मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे समजते की, भांडुप पश्चिमेकडील जंगल मंगल रोड येथील अभ्युदय बँक एटीएम सेंटरमध्ये  17 ते 19 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोपी नामे आरिफ सरफुद्दीन खान व तारिफ उस्मान खान या दोन आरोपीनी  अभ्युदय बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये  वेळोवेळी जाऊन एन आर सी कंपनीच्या  ATM च्या संगणकीय यंत्रणेमध्ये छेडछाड करून, एटीएम मशीन मध्ये फेरफार करीत असल्याचे दिसून आले.
 2 लाख 58 हजार रुपयांची अफरातफर झाल्याचे सिसीटिव्हिच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
बॅक मॅनेजर नरेंद्र राणे यांनी त्याला पकडून ठेवले.व‌ भांडुप पोलिसांना  तात्काळ कळवले.
22 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता शटर बंद करून
आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अनधिकृतरीत्या खोटे बनावट ATM कार्ड वापरून ATM मधून रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले. व अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली.
त्याचवेळी त्याचा गुन्ह्याच्या वेळी सोबत असलेला एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. तपासादरम्यान तो मुंबई विमानतळाच्या दिशेने गेल्याचे समजल्याने तात्काळ भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे यांनी
API. बागडे यांचे पथक नियुक्त केले व विमानतळावर पोहोचतास तारिफ उस्मान खान हा दिल्ली येथे विमानाने जाणार असतानाच पोलिसांनी मुसक्या आवळल्या व ताब्यात घेऊन भांडुप पोलिस ठाणे येथे आणून  अधिक चौकशी केली व  गुन्ह्यांमध्ये अटक केली.
पोलीस ठाण्यात  23 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा रजि.नंबर. गु. र. क्र. 573/2022 कलम 420,120, ब,34 IPC सह 66 खाली अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे यांच्या निगराणी खाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर,सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बागडे,पो उप नि. विकास जाधव पोलीस शिपाई  07324/मानकर,पोलीस शिपाई  06158/पाटील यांनी धाडसी कारवाई केली.

Share This

titwala-news

Advertisement