• Total Visitor ( 369280 )
News photo

राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू 

Raju tapal July 09, 2025 73

राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू 



जयपूर :- राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील रतनगढ भागातील भानुदा गावात हवाई दलाचं विमान कोसळलं आहे. विमानाच्या ढिगाऱ्याजवळ दोन मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमध्ये खळबळ उडाली. जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. लष्कराच्या पथकानंदेखील घटनास्थळी गाठलं आहे. या अपघाताचा तपास करण्यासाठी त्यांनी घटनास्थळ सील केलं आहे.



विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची स्थिती देखील खराब असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे.



जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान क्रॅश झाल्यानंतर शेतामध्ये आग लागली होती. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता.  आग विझवण्यास सुरुवात केल्यानंतर एक मृतदेह सापडला, त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरुच ठेवल्यानंतर दुसरा मृतदेह देखील सापडल्याची माहिती आहे. भारतीय हवाई दलाचं विमान का कोसळलं यासंदर्भातील सविस्तर कारण नंतर स्पष्ट होईल. स्थानिकांच्या माहितीनुसार एक विमान झाडावर पडलं. त्यामुळं ते झाड देखील पूर्णपणे जळून गेलं आहे. ज्या भागात विमान कोसळलं तो भाग वाळवंटाचा आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement