• Total Visitor ( 369922 )
News photo

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला

Raju tapal August 20, 2025 55

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला;

राजकीय वर्तुळात खळबळ;

हल्लेखोर पोलीसांच्या ताब्यात 



नवी दिल्ली :- दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानी आज बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी अनेक नागरिक तक्रार आणि समस्या घेऊन दाखल झाले होते. तेव्हा हल्लेखोर सुद्धा तक्रार देण्यासाठी जनता दरबारात हजर झाला. त्यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारली. तो जोरजोराने आरडाओरड करू लागला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच गडबडून गेले. पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेतले. दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते प्रविण शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता दरबारात तक्रार देण्याच्या बहाण्याने हा तरुण सीएम गुप्ता यांच्या जवळ पोहचला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे काही कागदपत्र दिली. मग तो आरडाओरड करू लागला आणि त्याने गुप्ता यांना चापट मारली.



पोलिसांकडून या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे, त्यानंतर त्यांना किती जखमा झाल्या आहेत हे स्पष्ट होईल. हल्लेखोर न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे वय 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले की, रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे असे मला वाटते.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement