बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात ; शिरूर तालुक्यातील बैलगाडा शौकिन मालकांची मागणी
-------------------
बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी शिरूर तालुक्यातील बैलगाडा शौकिनांनी तहसीलदार कार्यालयावर शर्यतीचे बैल, घोडे, वाजंत्र्याच्या साथीत मोर्चा काढून केली.
शिरूर तहसीलदार कार्यालय परिसरात वाजंत्र्याच्या साथीत शर्यतींच्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती .या मिरवणूकीत बैलगाड्यांच्या पुढे पळणारे घोडेही संबंधित मालक घेवून आले होते. येळकोट ,येळकोट जयमल्हार अशी घोषणा करण्यात येवून भंडा-याची मुक्त उधळण यावेळी करण्यात आली. तहसीलदार लैला शेख यांना गाडामालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत राज्य शासन चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.