बँक ऑफ महाराष्ट्रचे ए टी एम फोडून २४ लाखांची रोकड लंपास ; यवत येथील घटना
-----------------
पुणे - सोलापूर महामार्गावरील यवत येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ए टी एम फोडून चोरट्यांनी २४ लाखांची रोकड लंपास केली.
घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले असून यवत ता.दौंड पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
रात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २३ लाख ८१ हजार ७०० रूपये एटीएम फोडून लंपास केले.
विकास जालिंदर भगत यांनी या घटनेबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरीच्या दुस-या घटनेत राजगुरूनगरमध्ये भरदिवसा घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह साडेनऊ लाखांची चोरी झाल्याची घटना तिन्हेवाडी रोड येथे घडली.
अफसाना मोईन कुरेशी रा.साई व्हिला बिल्डींग तिन्हेवाडी रोड राजगुरूनगर यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली.
अज्ञात चोरट्यांनी रविवारी दि.१६/०१/२०२२ रोजी दुपारच्या सुमारास बंद सदनिकेचे कुलूप तोडून घरात असलेल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडून.त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम २ लाख ७० हजार रूपये, २ लाख २५ हजार रूपये किंमतीचे ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने ,५६ हजार रूपये किंमतीचे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मनीमंगळ सुत्र ,इतर दागिने असा एकूण ९ लाख ५१ हजार किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी भेट दिली.