भरदिवसा घराचा दरवाजा तोडून १८ तोळे सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड लंपास
Raju Tapal
January 18, 2022
49
भरदिवसा घराचा दरवाजा तोडून १८ तोळे सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड लंपास ; नेवासा तालुक्यातील घटना
भरदिवसा घराचा दरवाजा तोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडली.
लोहगाव येथील रंगनाथ दगडू ढेरे हे सकाळी शेतीच्या कामासाठी घर बंद करून पत्नीसह शेतात गेले.होते.
कामावरून पुन्हा साडेसहा वाजता घरी आल्यानंतर दरवाजा उघडा दिसला.
घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातून ,शोकेसमधून पाच तोळे वजनाचा सोन्याचा महाराणी हार, चार तोळे वजनाचे गंठण, दीड तोळ्याचे नेकलेस , दीड तोळ्याची सोन्याची चैन, ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, तीन तोळ्याचा लक्ष्मी हार, ५ ग्रॅम वजनाची बदाम अंगठी ,चांदीचे पंचपाळे, रोख रक्कम ५० हजार असा ऐवज चोरून नेला.
सोनई गावातून १४ जानेवारीला रात्री महावीर पेठेतील लक्ष्मीकांत दायमा यांच्या दुचाकीची चोरी झाली.
चोरीच्या दुस-या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील रामदास धना पाटील वय - ८२ या शेतक-याच्या घरातून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा ३ लाख ८७ हजार रूपये अज्ञाताने लंपास केले.
१४ जानेवारीला मुंदखेडा येथील सकाळी ९ वाजता रामदास धना पाटील हे परिवारासह तांदुळवाडी ता.भडगाव येथे गेले होते.
१५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता घरी परतल्यानंतर घराचा पाठीमागील दरवाजा अर्धा उघडा दिसून आला.
घरातील गोदरेज कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड ३ लाख ४९ हजार असे एकूण ३ लाख ८७ हजार अज्ञाताने चोरून नेल्याचे रामदास धना पाटील यांना दिसून आले.
चाळीसगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Share This