• Total Visitor ( 726192 )
News photo

ठाण्यात सेक्स रॅकेटवर क्राइम ब्रँचचा छापा...

Raju Tapal publisher October 13, 2026 36

ठाण्यात सेक्स रॅकेटवर क्राइम ब्रँचचा छापा...



हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असिस्टंट डायरेक्टरसह दोन महिलांची सुटका...



ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC), क्राइम ब्रँचच्या पथकासह कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहव्यापाराच्या संशयावरून कारवाई केली. पारसिक नगर परिसरातील अमित गार्डन हॉटेल आणि साई सागर NX हॉटेलजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत एका महिला एजंटला अटक करण्यात आली असून, हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असिस्टंट डायरेक्टर आणि एका अभिनेत्रीची अशा दोन महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.५० हजार रुपयांत व्यवहार ठरवल्याचा आरोप पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संबंधित महिला एजंट दोन महिलांना ग्राहकांकडे देहव्यापारासाठी पाठविण्याच्या उद्देशाने परिसरात येणार होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक आणि पंचांच्या मदतीने सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून संशयित महिला एजंटला ताब्यात घेण्यात आले आणि दोन्ही महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला एजंट सुटका करण्यात आलेल्या महिलांचे फोटो ग्राहकांना पाठवून देहव्यापाराचा कथित व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून चालवत असल्याचा आरोप आहे. या व्यवहारासाठी ५० हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्याची माहिती सुटका करण्यात आलेल्या महिलांनी हिंदी चित्रपट,दूरचित्रवाणी मालिका आणि लघुपटांमध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे.संबंधित माहितीनुसार,राम जन्मभूमी,काशी टू कश्मीर,श्रीनगर,वीरू (लघुपट),सावधान इंडिया, कुल्फी बाजेवाले,क्राइम पेट्रोल,वक्त (लघुपट),व्हर्टिकल सीरिज आणि हनुमान अंश यांसारख्या प्रकल्पांशी त्यांचा संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे.या माहितीची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप उपलब्ध नाही.इतर साथीदारांचा शोध सुरू या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आतापर्यंत किती महिलांना देहव्यापारासाठी ग्राहकांकडे पाठविण्यात आले आणि आरोपी महिला एजंटचा सुटका करण्यात आलेल्या महिलांशी संपर्क कसा आला, याचा तपास पोलीस करत आहेत.अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली,क्राइम ब्रँचचे डीसीपी अमर सिंह जाधव आणि एसीपी मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे, एपीआय स्नेहल शिंदे,एएसआय विजय पाटील,हेड कॉन्स्टेबल राजेश सुवारे,व्ही. जी. नाईक,दिनेश महाले,महिला पोलीस नाईक एस.के.कोल्हे,महिला पोलीस अंमलदार एच.आर.थोरात आणि चालक पोलीस अंमलदार व्ही. के. निकम यांच्यासह पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे शहर पोलिसांकडून सुरू आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement