शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील विद्यूतरोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीस
शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील शेताच्या बांधावर असलेले विद्यूतरोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीस जाण्याची घटना घडली.
डिंग्रजवाडी येथील नाबगे मळ्यातील नारायण दरेकर यांच्या शेतातील बांधावर असलेल्या विद्यूतरोहित्राचा विद्यूतपुरवठा खंडीत असल्याने विद्यूत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ कैलास गेडाम विद्यूतरोहित्राची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांना विद्यूतरोहित्र फोडून त्यातील १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरीस गेल्याचे दिसून आले.
याबाबत कैलास गेडाम वय -३९ रा.कोरेगाव भीमा ता.शिरूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने पुढील तपास करीत आहेत.