भातकुली मुलांच्या शाळेत शिक्षण परिषद संपन्न
भातकुली-पंचायत समिती भातकुली मधिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा, भातकुली येथे भातकुली केंद्राची शिक्षण परिषद बुधवार दि.१७ ला संपन्न झाली. शिक्षण परिषदेत चे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आ. दिनेश खेडकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे सदस्य विष्णु जाधव,श्रीकांत खरबडे सर (विषय साधन व्यक्ती पंचायत समिती भातकुली) होते तर मार्गदर्शक म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी नकाशे व आसरा केंन्दाचे केंद्र प्रमुख शैलेश दहातोंडे तसेच सतीश वानखडे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.त्यानंतर सामूहिक प्रार्थना घेऊन, मान्यवरांचे स्वागत गीताने शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक श्री नकाशे साहेब (कें. प्र.)यांनी केले तर आ.श्रीकांत खरबडे सर तथा आ.सतीश वानखडे सर,आ. रामकृष्ण चव्हाण सर यांनी शिक्षण परिषदेला मार्गदर्शन केले.यावेळी सकारात्मक शिक्षण,शिष्यवृत्ती,जानेवारीचे मासिक नियोजन यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वप्नाली खर्चान मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना सावरकर मॅडम यांनी केले. शिक्षण परिषद सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला व शिक्षण परिषदेची सांगता राष्ट्रवंदनांनी करण्यात आली अशाप्रकारे भातकुली केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात पार पडली.