बल्याणीत चार चाकी गाडीच्या काचा फोडल्या
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी परिसरातील एल.एन इंग्लिश स्कूलच्या जवळ उभी करून ठेवण्यात आलेल्या एका चार चाकी गाडीच्या काचा फोडण्याची घटना उघडकीस आली असून या बाबत पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या बाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार गोकुळ रामकिशोर सरोज यांची एम.एच.04 एच.एफ.0846 हि मारुती सुझुकी अल्टो 800 कंपनीची गाडी एल.एन इंग्लिश स्कूलच्या जवळ उभी करून ठेवलेली होती. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार गोकुळ सरोज यांनी गाडी घेतलेच्या रागातून रितेश कनोजिया,निखिल,आकाश (पूर्ण नाव माहित नाही) यानी उभ्या असलेल्या गाडीच्या चारही काचा कुठल्यातरी साहित्याने फोडल्या या बाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या बाबतचा अधिक तपास पोलीस निरिक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करीत आहे.