सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू..
कणकवलीत बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्य स्थिती तर वाहतूक ठप्प..
सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्याने गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे.
कुडाळ- कर्लीनदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्या वालावल चेंदवण कवठी.काळसे नदी काठच्या घरांना धोका पोचण्याची शक्यता प्रशासनाचा सावधतेचा इशारा.
तर कुडाळात पूरस्थिती तर अनेक मार्ग बंद
कुडाळ भंगसाळ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हॉटेल गुलमोहरकडील मार्ग वाहतुकीस बंद असुन, पावशीतील शेलटेवाडीसह नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे.तर कुडाळ रेल्वे स्टेशन मार्ग बंद झाला असून कुडाळ तालुक्यातील दुकानवाड पुलावर पाणी आल्याने मार्ग बंद आहे.
मुसळधार पावसामुळे परुळे आजपेवाडी येथील सागरी महामार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद