• Total Visitor ( 368985 )
News photo

राज्यात आजही मुसळधार पाऊस बरसणार

Raju tapal May 21, 2025 52

राज्यात आजही मुसळधार पाऊस बरसणार;

काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी 



मुंबई :- मान्सून पूर्वी पावसाने मंगळवारी महाराष्ट्राला झोडपले. पुणे, मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात वादळी पावसाने दाणादाण उडवली. आजही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण झालंय. आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ऑरेंज अलर्ट- 



सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, बीड, धाराशिव,



यलो अलर्ट- 



मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा



राज्यात मागील काही दिवसांपासून प्री-मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या हा पाऊस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होत आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement