• Total Visitor ( 84653 )

केडीएमसी आयुक्तांचे अनधिकृत घरे न घेण्याचे जाहीर आवाहन

Raju Tapal May 19, 2022 38

केडीएमसी आयुक्तांचे अनधिकृत बांधकामे खरेदी न करण्याचे जाहीर आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेल्या इमारती तसेच चाळींच्या अनधिकृत खोल्याचे बांधकामे काही प्रमाणात सुरू आहेत. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अश्या प्रकारची अनधिकृत बांधकामे खरेदी केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. नागरिक सदरील अनधिकृत बांधकामांबाबत कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता कागद पत्रांची मंजुरी वगैरे बघत नाहीत. आयुक्तांनी 20 हजार अनधिकृत बांधकामे नेस्तनाबूत करण्याचे उद्दिष्टये राबविले असून याचाच एक भाग म्हणून केडीएमसी क्षेत्रात जागोजागी जाहीर आवाहन चे फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पावले उचलली आहेत. अ प्रभागातील तब्बल पाच ठिकाणी यामध्ये प्रामुख्याने श्री महागणपती मंदिर चौक,रेल्वे गेट,अ प्रभाग क्षेत्र कार्यालय व अन्य ठिकाणी सदरील बोर्ड लावलेले असून नागरिकांनी कागदपत्रांची खातरजमा करूनच घरे खरेदी करावीत असे नमूद केलेले आहे. तसेच अनधिकृत बांधकामांबाबत खातरजमा करण्याबरोबरच तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. अ प्रभागात देखील नागरिकांनी घरे,दुकाने किंवा इमारतीतील घरे घेण्यापूर्वी महापालिका कार्यालयात येऊन कागदपत्रांची तपासणी व मंजुरी तपासून मगच घर खरेदी करावे असे केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त तथा अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी टिटवाळा न्यूजशी बोलताना सांगितले.

Share This

titwala-news

Advertisement