केडीएमसीचे रुग्णालय म्हणजे कत्तलखाने !
कल्याण :- कल्याण डोंबिवलीत आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयात मृत्यू. डॉक्टर अनुपलब्ध, व्यवस्थेची उदासीनता, आणि गरिबांच्या जीवाची ना किंमत ना वाली. पाच तास रुग्णवाहिकेसाठी वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांना शेवटी मृत्यूच प्राप्त झाला. ही घटना केवळ एक अपवाद नाही. कल्याण पूर्व आणि डोंबिवलीतही असेच मृत्यू आधी घडले आहेत. ही आरोग्य यंत्रणा नव्हे, ही मृत्यूयंत्रणा आहे.
शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं हे अपयश की आमच्या जीवाचं अवमूल्यन? "पैसे नाहीत? मग तडफडा आणि मरा" असा संदेश मिळतोय या सगळ्या व्यवस्थेतून. काही तरी बदला, नाहीतर उद्या कुणाचा जीव गमावला जाईल याची खात्री नाही.