खंडाळ्यातून अपहरण झालेल्या युवकाची बारामतीत सुटका ; ४ जणांवर गुन्हा दाखल
--------------------
खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या युवकाची बारामती तालुका पोलीसांनी माळेगाव बुद्रूक येथे सुटका केली.
अनिकेत मिलिंद पिके वय -३१ जुना वासुंबे रस्ता विटा ता.खानापूर जि.सांगली असे सुटका करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी आकाश रघुनाथ टेंगले वय २८ ,अल्ताफ अब्बास इनामदार वय ४० दोघेही रा.म्हसोबावाडी पणदरे ता.बारामती ,राहुल भरत सोनवणे वय ३३ कुलदीप चंद्रकांत जावळे वय २४ दोघेही रा.माळेगाव बुद्रूक ता.बारामती अशी गुन्हा दाखल झालेल्या चारजणांची नावे आहेत.
शुक्रवारी दि.८ सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान खंडाळा बसस्थानकाजवळील पुजा बारमधून आकाश टेंगले याने तीन साथीदारांनी पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारातून आत्ताच्या आत्ता तीन लाख रूपये द्यायचे नाही तर अनिकेतला उचलून घेवून जाणार अशी धमकी फिर्यादीला दिली.
त्यानूसार अनिकेत याचे एस यु व्ही मोटारीतून अपहरण करण्यात आले.
खंडाळा पोलीसांकडून एम एच १४ डी एन ०१२६ या वाहनाची माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याला दिली.
त्यानुसार बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे, दीपक दराडे, प्रशांत राऊत पोलीस नाईक चांदणे यांनी नाकाबंदी करून गाडी अडवून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली.