दौंड शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकवून ३० लाख रूपये किंमतीचे मोबाईल व घड्याळे चोरट्यांनी लंपास केले.
यासंदर्भात दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अज्ञात चोरट्यांच्या विरोधात दौंड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून डी.वाय.एस पी राहूल धस यांनी चोरी झालेल्या दुकानाची पाहणी केली.
दुकानाच्या तळघरात ९ इंच उंचीची ३ फूट लांब असलेल्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून त्यासमोरील फ्रीज सरकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
उप अधिक्षक राहूल धस, प़ोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुणे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले .पुढील तपास सुरू आहे.