लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून एकाचा दारू पाजून खून ; खेड तालुक्यातील मोई -निघोजे रस्त्यावरील घटना
लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून एकाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील मोई निघोजे रस्त्यावर शनिवारी दि.23 ऑक्टोबरला दुपारी तीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एका आरोपीस चाकण पोलीसांनी अटक केली.
प्रवीण रामदास गवारी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे रा.मोई ता.खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मयत प्रवीण गवारी याने आरोपी महेश येळवंडे याच्या घरी जावून त्याच्या लहान बाळाला ढकलून दिले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी प्रविण याला जीवे मारण्याच्या उद्देशाने घरातून निघून गेले. मोई ते निघोजे रस्त्यावर अजित गवारी यांच्या घराजवळ नेऊन आरोपींनी प्रवीण याला दारू पाजली.त्यानंतर हत्याराने प्रवीणच्या डोक्यात ,हातावर आणि पायावर मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रवीणचा मृत्यू झाला.
मयत प्रवीण याचा भाऊ संदीप रामभाऊ गवारी वय -42 रा.मोई ता.खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण, महाळूंगे पोलीसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी महेश येळवंडे याला अटक केली. आरोपीचे दोन तीन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.