• Total Visitor ( 369920 )
News photo

करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Raju tapal September 04, 2025 77

करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प



वैभववाडी :- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळून हा मार्ग वाहतूकसाठी ठप्प झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोसळलेल्या दरडीमुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांना फटका बसला आहे. कोसळलेल्या दरडीत भले मोठे दगड असल्याने शिवाय दाट धुक्यामुळे दरड हटविण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास सायंकाळ पर्यंत वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.



गेले काही दिवस तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका हा करुळ घाटमार्गाला बसला आहे. यापूर्वीही या घाटमार्गात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे वाहतुकीवर परिणाम होत असतानाच वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच गुरुवारी सकाळी या घाटमार्गात दरड कोसळून हा मार्ग वाहतूकसाठी ठप्प झाला आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा सुमारे 50 फूट भाग व्यापला गेला आहे. शिवाय कोसळलेल्या दरडीत भले मोठे दगड रस्त्यावर पडले आहेत. हा घाटमार्ग ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. पोलिसांकडून वाहचालकांना याबाबत सूचना केल्या जात आहेत. हा मार्ग सुरळीत करण्यासाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने या मार्गावरील दरड हटविण्याचे काम सुरु आहे. मात्र कोसळलेल्या दरडीत भले मोठे दगड असल्याने ब्रेकर च्या साहाय्याने ते फोडले जाणार आहेत. दाट धुक्यामुळे यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्यास वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement