वाहने अडवून लुटण्याच्या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला बारड पोलीसांकडून अटक
वाहने अडवून लुटण्याच्या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला रात्रीच्या गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या बारड पोलीसांनी अटक केली.
प्रदीप उर्फ बंटी श्रीराम श्रावणे वय २४ रा.पुसद जि.यवतमाळ ,संतोष उर्फ साईनाथ तरटे वय २२ रा.खोब्रागडे नगर , रवी नामदेव गायकवाड वय - २० रा. व्यंकटेशनगर मुदखेड ,अभिषेक उर्फ अभी त्र्ंबकराव नागरे वय -१९ रा.गिरगाव ,मालेगाव व एका विधीसंघर्ष १६ वर्षीय बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या आरोपी टोळीकडून अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल , एक जिवंत काडतूस, तीन लोखंडी पाते असलेले खंजर, एक गुप्ती ,२० फुट लांब दोरी, दोन दुचाकी असा एकूण ८६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सोनवणे, हवालदार भानूदास वडजे, मारूती तेलंगे, संजय केंद्रे, विठ्ठल शेळके, रवी बाबर ,तानाजी येळगे, मोतीराम पवार, विलास कदम, अर्जून शिंदे, कलीम शेख या पोलीसांनी बारड ते मुदखेड रस्त्यावर गॅस गोडावून परिसरात गोडसे यांच्या आखाड्याजवळ ही कारवाई केली.