मंत्रालयातील लिपिकाची तिघा चोरट्यांकडून लूट
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- मंत्रालयातील लिपिकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शिरूर तालुक्यातील खंडाळे माथा येथे रविवारी दि.१३ जुलैला पहाटे घडली.
रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार,मंत्रालयात लिपिक असलेले अक्षय हनुमंत बोरगे रा.उलवे ता.पनवेल जि.रायगड मूळ रा.बाभुळखूंटा जि.बीड हे अशोक यादव व गणेश कारंडे यांच्यासह एम एच १२ डब्ल्यू डब्ल्यू ४०५० या क्रमांकाच्या त्यांच्या मोटारीतून अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना झोप लागल्याने त्यांनी त्यांची मोटार खंडाळे माथा परिसरातील एका हाॅटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली.ते मित्रांसह मोटारीत विश्रांती घेत असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी मोटारींचा दरवाजा उघडून अक्षय हनुमंत बोरगे यांच्यासह त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील एक तोळ्याची सोनसाखळी, सहा ग्रॅमची अंगठी, घड्याळ,४ हजार रूपयांची रोकड असा एकूण १ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज लूटून पोबारा केला.