मित्राच्या पत्नीची अश्लील इमेज तयार केल्याच्या कारणावरून होमगार्डला अटक
छायाचित्रात छेडछाड करत मित्राच्या पत्नीची अश्लील इमेज तयार केल्याच्या कारणावरून बारामती पोलीसांनी एका होमगार्डला अटक केली.
अभिजित विजय हटकर रा.माळेगाव बुद्रूक ता.बारामती जि.पुणे असे अटक करण्यात आलेल्या होमगार्डचे नाव आहे.
फिर्यादी महिला आरोपी हटकर याच्या मित्राची पत्नी असून तिच्या घरी त्याचे येणे जाणे होते. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून मोबाईल क्रमांकावर सोशल मिडियाच्या मदतीने अश्लील शेरेबाजी केली. मा महिलेच्या छायाचित्रात अश्लील इमेज तयार केली. त्यानंतर ही छायाचित्रे त्याने तिच्या मोबाईल क्रमांकावर पाठविली. त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज पाठविले. त्यामुळे या महिलेने.पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोपाळ ओमासे पोलीस नाईक किरण कदम अतूल जाधव यांनी सायबर सेलची मदत घेत महत्वाची भुमिका बजावली.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पुढील तपास करत आहेत.