• Total Visitor ( 369278 )
News photo

राज्यात मान्सूनचा कहर

Raju tapal June 14, 2025 77

राज्यात मान्सूनचा कहर;

अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस;

रत्नागिरी,रायगडला आज रेड अलर्ट 



मुंबई :- राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे,अहिल्यानगर भागांतून मान्सून आज शनिवारी (14 जून) पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच मुंबई व रायगडला आज,तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या (जून 15,रविवारी) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात 14 ते 19 जून,मध्य महाराष्ट्रात 14 व 15 जून,मराठवाड्यात 17 जून,तर विदर्भात 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.



राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून मध्यप्रदेश,विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र,गोवा आणि कोकणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शनिवारी ठाणे,मुंबई,पुणे,सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा आणि जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



याठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ लागू करण्यात आला आहे. मान्सूनची वाटचाल पाहता,पुढील काही दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि  काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागात 46 मिमी,तर शिवाजीनगर भागात 26.5 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी(15 जून) साठी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement