• Total Visitor ( 369578 )
News photo

मोटरसायकल चोरांना पकडण्यात रांजणगाव एम आय डी सी पोलीसांना यश

Raju Tapal May 17, 2022 87

मोटरसायकल चोरांना पकडण्यात रांजणगाव एम आय डी सी पोलीसांना यश आले असून त्यांच्याकडून पोलीसांनी १७ दुचाकी मोटरसायकली ताब्यात घेतल्या.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली गंगाराम कौतुके रा.अमळनेर जि. अहमदनगर, रोहित सुभाष बोंद्रे, शुभम शिवाजी रवटे दोघेही रा.शिबलापूर ता.संगमनेर जि.अहमदनगर, गणेश भाऊसाहेब नांगरे रा.खळी ता.संगमनेर जि.अहमदनगर, रमाकांत बाजीराव करपे रा.गणेगाव ता.शिरूर अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरलेल्या १७ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.

पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते , शिरूर विभागाचे  उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी तसेच पोलिसांनी ही कारवाई केली.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement