मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधील लुटप्रकरणी दोघा आरोपींना लोहमार्ग पोलीसांनी अटक केली.
कुंजीर अहि-या पवार वय -१९ रा.खडकी ता.दौंड , दीपक चंद्रकांत मुंगळे वय - ३० रा.भगतवाडी ता.करमाळा जि.सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपींना खडकी येथून अटक केली.
पुणे - दौंड लोहमार्गावरील नानवीज ता.दौंड रेल्वे फाटकजवळ २६ ऑक्टोबरला रात्री रेल्वे सिग्नलच्या तारा तोडून एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. चोरट्यांनी मीनाक्षी शिवपुत्र गायकवाड वय -२५ रा.सोलापूर व कल्पना विनायक श्रीराम वय -५९ रा. वालचंद कॉलेजजवळ सोलापूर या दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील १ लाख ५५ हजार रूपयांचे दागिने लुटले होते.
चोरट्यांना पकडण्यासाठी डब्यातून खाली उतरलेले राकेश गायकवाड रा.सोलापूर या प्रवाशाला गंभीररीत्या जखमी केले होते.
चोरीच्या या घटनेसंदर्भात टिटवाळा न्यूजने दिनांक २७/१०/२०२१ रोजी कोणार्क एक्स्प्रेसमधील महिलांच्या गळ्यातील संगळसुत्र व साखळी लंपास या शिर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते.
दौंड लोहमार्ग पोलीसांनी कूंजीर अहि-या पवार, दीपक चंद्रकांत मुंगळे या आरोपींना खडकी येथून अटक केली.
पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक ताराचंद सुडगे, यांच्यासह पोलीस हवालदार सुनील कदम, धनंजय वीर, मनोज साळवे, अजित सावंत, पोलीस नाईक सर्फराजखान संतोष पवार, रमेश पवार, बनसोडे, प्रियांका खरात, वनिता समिंदर एकनाथ लावंड, यांनी कारवाईत सहभाग घेत आरोपींना ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी पत्रकारांना दिली.