ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचा धक्का लागून एकाचा मृत्यू
शिक्रापूर:- ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि.८ जानेवारीला दुपारी शिरूर तालुक्यातील कर्डे -निमोणे रस्त्यावर घडली. कैलास मारूती गायकवाड वय -५१ रा.निमोणे ता.शिरूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघाताबाब समजलेल्या माहितीनूसार,कैलास गायकवाड हे गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कर्डे गावाहून त्यांच्या दुचाकीवरून निमोणे गावाकडे जात होते. समोरून येत असलेल्या ऊसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीस्वार गायकवाड खाली पडले.दोन्ही पायांवरून ट्रॅक्टर ट्राॅलीची चाके गेल्याने ते गंभीर जखमी झाले.तातडीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित झाले. पोलीस हवालदार पवार या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.