• Total Visitor ( 741665 )
News photo

राज्यस्तरीय गटका स्पर्धेत राधिका चौधरीची चमकदार कामगिरी....

Raju Tapal publisher October 24, 2026 17

राज्यस्तरीय गटका स्पर्धेत राधिका चौधरीची चमकदार कामगिरी....



ज्ञानदीप विद्यामंदिर,मुंब्रा येथील विद्यार्थिनीने पटकावला द्वितीय क्रमांक,रौप्य पदकाने गौरव...



साक्षी पवार.



मुंब्रा :- महाराष्ट्र राज्य गटका असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय गटका स्पर्धेत ज्ञानदीप विद्यामंदिर,मुंब्रा येथील विद्यार्थिनी कुमारी राधिका चौधरी हिने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवले आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून,तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद,गटका असोसिएशन,सोलापूर आणि महाराष्ट्र राज्य गटका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय शालेय गटका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राधिकाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल ज्ञानदीप विद्यामंदिर आणि ज्ञानदीप  कॉन्व्हेंट स्कूल,मुंब्रा यांच्या वतीने विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यातर्फे तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.या यशामागे राधिकाची मेहनत, जिद्द आणि सराव यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि प्रोत्साहन देणारे पालक यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले.राधिकाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष.सतीश चंद्रकांत देसाई,सचिव,समीर चंद्रकांत देसाई,उपाध्यक्ष.शिवानी सतीश देसाई  खजिनदार.प्रवीणा समीर देसाई ,मुख्याध्यापक हेमंत आनंद नेहते,मुख्याध्यापिका कोमल हेमंत ठाकरे, तसेच मार्गदर्शक शिक्षक आकाश दुबे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement