आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी राजेश दादारावजी सावरकर यांची निवड
अमरावती:- ध्येय एज्युकेशन फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,उत्तमसरा येथील शिक्षक राजेश दादारावजी सावरकर यांची निवड झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित सेवा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सावकर हे पंचायत समिती भातकुली,जिल्हा अमरावती अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच विद्यार्थी,पालक आणि सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे. राजेश सावरकर यांची आदर्श शिक्षक पुरस्कारा साठी निवड झाल्या बद्दल प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,अमरावती जिल्हा नेते गोकुलदास राऊत,जिल्हा मार्गदर्शक संभाजी रेवाळे,जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार,जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे,कार्याध्यक्ष प्रशांत निमकर,कोषाध्यक्ष नंदकीशोर पाटिल,कार्यालयीन सचिव मनिष काळे,राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे,महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,सरचिटणीस विनिता घुलक्षे,कार्याध्यक्ष सुषमा वानखडे,जिल्हा कोषाध्यक्ष भावणा ठाकरे,तुळशिदास धांडे,उमेश चुनकीकर,संगिता तडस जिल्हा,तालुका पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.