राज्य उत्पादन शुल्क विभागाची आंबेगाव , हवेली तालुक्यात कारवाई
राथ्य उत्पादन शुल्क विभागानै आंबेगाव,हवेली तालुक्यात कारवाई करून बनावट देशी, विदेशी दारूचा साठा, बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरीट , रिकाम्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे यंत्र टेम्पो असा एकूण ९ लाख १४ हजार ४३२ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सागर तुकाराम कतोरे मयुर बाळासाहेब कतोरे दोघेही रा.चिंबळी ता.खेड अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक ए.बी.पवार यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार बनावट दारू घेवून वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सापळा रचून ३० डिसेंबरला कळंब येथील पंचमी हॉटेल च्या मागील बाजूस उभ्या असलेल्या टेम्पोची तपासणी केली असता बनावट देशी विदेशी दारूच्या बाटल्या असलेले १४ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी सागर कतोरे, मयूर कतोरे यांना अटक करून टेम्पोसह मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आरोपींकडे चौकशी केली असता हवेली तालुक्यातील काळेवाडी येथील गोडावूनमध्ये बनावट मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाल्याने गोडावूनमध्ये छापा टाकून बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे यंत्र ,बुच असा मुद्देमाल जप्त केला.