अल्पवयीन तरूणावर कोयत्याने हल्ला करणा-या आरोपींना रांजणगाव एम आय डी सी पोलीसांकडून अटक शिरूर:-
अल्पवयीन तरूणावर कोयत्याने हल्ला करून दुचाकींवर पळून गेलेल्या टोळक्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी बीड जिल्ह्यातील केज येथे पाठलाग करून पकडले.
शंकर जालिंदर करंजकर रा.कळंब, धाराशिव,ओम दत्ता चव्हाण धानोरा, वाशिम, रोहन रघूनाथ बोटे भानगाव,अहिल्या नगर, ओंकार विजय देशमुख डोनवाडा,हिंगोली, गिरीश गोविंद क-हाळे हिवरा, हिंगोली, गोरख विठ्ठल मोरे कृष्णानगर, नांदेड, हर्षल सुरेश पारवे शिवानी, हिंगोली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे वास्तव्यास होते.
रविवार दि.२३ मार्चला कारेगाव येथील एका सोसायटी समोर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात सौरभ श्रीराम राठोड वय -१७ रा.कारेगाव ता.शिरूर मूळ रा.शिवाजीनगर जि.परभणी हा गंभीर झाला होता.त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक निळकंठ तिडके, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे,उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रवीण पिठले, विजय सरजिने, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर,माऊली शिंदे, रामेश्वर आव्हाड , स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव या पोलीस अधिका-यांनी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या सहकार्याने दुचाकींवरून पळून जात असलेल्या सातही आरोपींना बीड जिल्ह्यातील केजजवळ पाठलाग करून पकडले.