• Total Visitor ( 370010 )
News photo

रेल्वे अधिका:यास मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून लूटणारे त्रिकूट गजाआड

Raju Tapal May 20, 2022 90

रेल्वे अधिका:यास मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून लूटणारे त्रिकूट गजाआड

रेल्वे अधिका:याला लूटणा:या त्रिकूटास आरपीएफच्या मदतीने कल्याण जीआरपीने अटक केली आहे. रेल्वे यार्डात घरी जाताना रेल्वे अधिकारी चंद्रकांत कारंडे यांच्या सोबत हा प्रकार घडला होता. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

मुंबई येथील वांद्रे येथील रेल्वेत चंद्रकांत कारंडे हे कामाला आहे. काल रात्री ते सेकंड शिफ्ट करुन घरी परतत होते. ते राहण्यास कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात आहेत. कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात ते त्यांची दुचाकी उभी करुन ठेवतात. काल रात्री दुचाकी सुरु करुन घरी जाण्यासाठी निघाले असता तीन जण त्यांच्या जवळ आले. चाकूचा धाक दाखवून तिघांनी त्यांच्या जवळचा मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली. चंद्रकांत यांनी यावेळी आरडाओरडा सुरु केला. यार्डात कार्यरत असलेले आरपीएफ जवान आणी साध्या वेशातील पोलिस त्यांचा आवाज ऐकून मदतीला धावले. लूटून पळणा:या तिघांना त्यांनी पकडले. आरोपींची नावे राहूल पवार, राहूल होरोले आणि दत्ता मंडलीक अशी आहेत. या तिघांनी यापूर्वी कोणाला लुटले आहे का याचा तपास आत्ता पोलिसांनी सुरु केला आहे अशी महिती कल्याण रेल्वेच्या महिला पोलिस अधिकारी अर्चना दुसाने यांनी दिली आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement