मनसेच्या ‘गर्जना जन आक्रोश स्वाक्षरी’ मोहिमेला टिटवाळ्यात प्रतिसाद
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात मनसेची ‘गर्जना जन आक्रोश स्वाक्षरी मोहीम’
टिटवाळ्यात शेकडो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून नोंदवला निषेध
राजू टपाल.
टिटवाळा :-निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टिटवाळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘गर्जना जन आक्रोश स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि राज्य सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार,दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शेकडो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला निषेध नोंदविल्याची माहिती आयोजकांनी दिली. या मोहिमेचा शुभारंभ मांडा-टिटवाळा पूर्व येथील गणपती मंदिर रोडवरील जलाराम सोसायटीजवळ असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे सांगत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. मोहिमेला स्थानिक रहिवासी,महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत अनेक नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आपला निषेध व्यक्त केला. मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची उपस्थिती या मोहिमेला उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय,उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील,शाखाध्यक्ष मिलिंद सावंत,भूषण जाधव,जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष जयेश खंदारे,उपशाखाध्यक्ष समीर मैस्त्री,रविंद्र दसुरी,सचिन किलजे,अमेय पाटकर,योगेश भालेराव,अविनाश जाधव,राजेश सोष्टे आणि विद्यार्थी सेनेचे दिपेश जाधव उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सैनिक गजानन म्हावशे,गिरीश यशवंत राव,विलास मैस्त्री यांच्यासह महिला सेना,विद्यार्थी सेना आणि मनसेच्या विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टिटवाळा शहरात राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या भावना आणि आक्षेप मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला.