राज्य कॅरम स्पर्धेत सागर-काजलला अग्रमानांकन
रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले (पूर्व) येथे २९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता पुरुष एकेरी गटाने ५ व्या राज्य मानांकन स्पर्धेची सुरुवात होत आहे. तर ३० मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून महिला एकेरी गटांच्या सामन्यास प्रारंभ होईल.
पुरुष गटात २६० तर महिला गटात ४० खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे : पुरुष एकेरी : १) सागर वाघमारे (पुणे), २) महम्मद घुफ्रान (मुंबई), ३) विकास धारिया (मुंबई), ४) संजय मांडे (मुंबई), ५) योगेश परदेशी (पुणे), ६) प्रशांत मोरे (मुंबई), ७) हरेश्वर बेतवंशी (मुंबई) ८) संदीप दिवे (मुंबई उपनगर)
महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), कदम (रत्नागिरी), ४) रिंकी कुमारी (मुंबई), ५) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ६) मिताली पाठक (मुंबई), ७) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ८) श्रुती सोनावणे (पालघर)